Zechariah 1:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी देवाला विचारले, “ते चार कामगार कशासाठी येत आहेत?” तो म्हणाला, “ते शिगांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना दूर भिरकावून देण्यासाठी आले आहेत. त्या शिंगांनी यहूदाच्या लोकांना बळजबरीने देशोधडीला लावले. त्या शिंगांनी कोणालाही दया दाखवीली नाही. ती म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करुन त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची प्रतीके आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी विचारले, “ह्यांचे येथे काय काम?” तो मला म्हणाला, “ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणाला आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांना भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले त्यांची शृंगे पाडून टाकावीत म्हणून हे आले आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी विचारले, “हे काय करण्यासाठी आले आहेत?” तेव्हा याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “ही ती चार शिंगे आहेत ज्यांनी यहूदीयाची इतकी पांगापांग केली, की कोणीही आपले मस्तक वर उचलू शकले नाही, पण हे शिल्पकार त्या चार शिंगांना पकडून भयभीत करून व यहूदीयाविरुद्ध आपली शिंगे उंच करून तिच्या लोकांची पांगापांग करणाऱ्या राष्ट्रांना फेकून देण्यासाठी आले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांस विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”