Zechariah 1:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पारसचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या म्हणजे शेवटच्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्याला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. (जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा. बरेख्या संदेष्टा इद्दोचा मुलगा.) संदेश असा होता:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा: