Zechariah 10:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “मी मेंढपाळांवर (नेत्यांवर) फार रागावलो आहे, माझ्या मेंढरांच्या (लोकांच्या) ह्या स्थितीला मी त्यांना जबाबदार धरले आहे.” (यहूदातील लोक म्हणजे देवाच्या मेंढ्यांचा कळपच. सर्व शक्तिमान परमेश्वर ह्या कळपाची खरोखरच काळजी वाहतो. एखादा सैनिक जशी आपल्या सुंदर घोड्याची काळजी घेतो, तशीच काळजी देव ह्या माणसांची घेतो.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मेंढपाळांवर माझा क्रोध भडकला आहे, बोकडांचे मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराणे त्याची भेट घेतली आहे, तो त्यांना आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो, आणि मी पुढार्यांना शिक्षा करेन; कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील, आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.”