Zechariah 10:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते आपल्या शत्रूचा पराभव करतील. रस्त्यांतून चिखल तुडवीत जावे, तसे ते शत्रूला तुडवीत जातील. परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि शत्रूच्या घोडदळाचासुध्दा पराभव करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.”