Zechariah 10:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी यहूद्यांच्या लोकांना सामर्थ्यवान बनवीन. योसेफच्या वंशाला युध्द जिंकण्यास साहाय्य करीन. आणि त्यांना सुरक्षितपणे व सुखरुप परत आणीन. त्यांचे सांत्वन करीन आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना मदत करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी यहूदाहला बलवान करेन आणि योसेफाच्या वंशास वाचवेन. मी त्यांची पुनर्स्थापना करेन कारण मी त्यांच्यावर करुणा करतो. ते असे होतील, जणू काही मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता, कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे आणि मी त्यांचा धावा ऐकेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.