Zechariah 10:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भरपूर मद्य घेतलेल्या सैनिकांप्रमाणे एफ्राईमचे लोक खूष होतील. लहान मुले आनंदून जातील. तेही खुष होतील. परमेश्वराबरोबरचा त्यांचा वेळ आनंदात जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफ्राईम वीरासारखा होईल, द्राक्षारसाने होते तसे त्यांचे हृदय हर्षित होईल; त्यांची मुले हे पाहून उल्लास पावतील; त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठायी आनंदेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफ्राईमी योद्ध्यांसारखे होतील, द्राक्षारसाने व्हावे तसे त्यांचे हृदय आनंदित होईल. त्यांची मुलेसुद्धा हे पाहतील आणि उल्लास पावतील; त्यांची हृदये याहवेहच्या ठायी आनंदित होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.”