Zechariah 11:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचे पुढारी मालकांसारखे व व्यापाऱ्यांसारखे आहेत. मालकांनी मेंढ्या मारल्या. तरी त्यांना शिक्षा होत नाही. व्यापारी मेंढ्या विकतात आणि म्हणतात, “परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो.” मेंढपाळांना मेंढ्यांबद्दल वाईट वाटत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे मालक त्यांचा वध करतात व आपणांला निर्दोष समजतात; त्यांची विक्री करणारे म्हणतात की, ‘परमेश्वराचा धन्यवाद होवो; मी श्रीमंत झालो आहे;’ त्यांचे स्वत:चे मेंढपाळ त्यांच्यावर काही दया करत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे ग्राहक त्यांची कत्तल करतात आणि त्याबद्दल काहीही शिक्षा न होता निसटून जातात. जे त्यांना विकतात, ते म्हणतात, ‘याहवेहची उपकारस्तुती असो, मी श्रीमंत आहे!’ त्यांचे स्वतःचे मेंढपाळदेखील त्यांना दयामाया दाखवित नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे मालक त्यांना ठार मारतात आणि स्वत:ला दोषी मानत नाहीत. ते त्यांना विकतात आणि म्हणतात, ‘परमेश्वराचे स्तुतीस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो आहे!’ त्यांच्या स्वतःच्या मेंढपाळांना त्यांची दया आली नाही.