Zechariah 11:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी त्या बळी देण्यासाठी पोसलेल्या मेंढ्यांची काळजी घेतली. गरीब बिचाऱ्या मेंढ्या! मला दोन काठ्या मिळाल्या. एका काठीला मी नाव दिले कृपा व दुसरीला ऐक्य मग मी मेंढ्यांची निगा राखण्यास सुरवात केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चारले, मेंढरांतल्या अतिशय दुबळ्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एकीचे नाव रमणीयता व दुसरीचे नाव बंधन असे ठेवले. आणि मी त्या कळपांना चारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा, विशेषतः कळपात अत्याचार होत असलेल्या मेंढरांचा मेंढपाळ झालो. मग मी मेंढपाळांच्या दोन काठ्या घेतल्या, एकीला मी कृपा व दुसरीला ऐक्य असे नाव दिले आणि मेंढरांचे राखण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी त्या ठार मारण्यासाठी नेमलेल्या कळपाचा मेंढपाळ झालो. त्यांच्यातील अगदी मरणास टेकलेल्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एका काठीला मी रमणीयता व दुसरीला ऐक्य असे नाव दिले. मग मी त्या कळपाची निगा राखण्यास सुरवात केली.