Zechariah 12:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पाहा! मी यरुशलेमला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांचा विषाचा प्याला बनवीन. ती राष्ट्रे त्या नगरीवर चढाई करुन येतील. आणि सर्वच्या सर्व यहूदाला वेढा पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पाहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकंडवणार्‍या कटोर्‍यासारखे करतो; यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल.1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पाहा! मी यरूशलेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरूशलेमेला वेढतील तेव्हा यहूदाचेही तसेच होईल.