Zechariah 12:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदाचे नेते लोकांना प्रोत्साहन देतील. ते म्हणतील, “सर्व शक्तिमान परमेश्वर तुमचा देव आहे. तो आपल्याला बळ देतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की, ‘यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग यहूदाहची कुळे आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे लोक सामर्थ्यशाली आहेत, कारण सर्वसमर्थ याहवेह त्यांचे परमेश्वर आहेत.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहूदाचे पुढारी आपापल्या मनात विचार करतील, ‘यरूशलेमेतील राहणारे रहिवासी त्यांचा देव सैन्यांचा परमेश्वर, याच्या ठायी माझे सामर्थ्य असे आहेत.’