Zechariah 13:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण इतर लोक त्याला विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला मार देण्यात आला!”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला जर कोणी विचारले की, ‘तुझ्या बाहूंच्यामध्ये ह्या जखमा कसल्या?’ तर तो म्हणेल, ‘माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण इतर लोक त्यास विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे वण होत!”