Zechariah 14:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरील कोणत्याही कुटुंबातील लोक यरुशलेमला प्रभुराजाची, सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करायला गेले नाहीत तर परमेश्वर त्यांच्या प्रदेशात पाऊस पाडणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी असे होईल की, पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यांच्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पृथ्वीवरील जी सर्व कुटुंबे यरूशलेमेला प्रभूराजाची, सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला जाणार नाहीत त्यांच्या देशात परमेश्वर पाऊस पाडणार नाही.