Zechariah 14:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दरी जसजशी रुंदावून तुमच्याकडे सरकेल, तसतसे तुम्ही दूर पळायचा प्रयत्न कराल यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल. पण माझा परमेश्वर, देव तेथे अवतरेल आणि त्याच्याबरोब त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही माझ्या डोंगराच्या खोर्याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुझ्यासमागमे तुझे सर्व भक्त येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही माझ्या खोर्यातून पळ काढाल, कारण ते खोरे आझल नगरीच्या वेशीपर्यंत भिडेल. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी तुमचे लोक, यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या काळात भूकंप झाला होता तेव्हा निसटून गेले होते, त्याचप्रमाणे तुम्हीही निसटून जाल आणि मग याहवेह, माझे परमेश्वर येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व पवित्रजनही येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तुम्ही माझ्या पर्वताच्या खोऱ्याकडे पळाल, कारण ती दरी आसलापर्यंत पोहोंचेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल; पण माझा परमेश्वर, देव तेथे येईल आणि तुमच्याबरोबर त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.