Zechariah 3:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वराचा दूत म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला दोष देतो, आणि तो तुला दोष देतच राहील. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरुशलेमची निवड केली आहे. आगीतून पेटलेल्या काटकीला ओढून काढावे, तसे देवाने यरुशलेमला वाचविले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वर सैतानास म्हणाला, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेह सैतानाला म्हणाले, “अरे सैताना, याहवेह तुला धमकावितात! यरुशलेमची निवड करणारे याहवेह तुला धमकावितात! अग्नीतून बाहेर ओढून काढलेल्या जळत्या कोलितासारखा हा मनुष्य नाही का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरूशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?”