Zechariah 3:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग जवळ उभ्या असलेल्या इतर देवदूतांना हा देवदूत म्हणाला, “यहोशवाची मळकी वस्त्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत योशीयाशी बोलला. तो म्हणाला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि वस्त्रबदल म्हणून तुला नवीन वस्त्रे देत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तिथे उभे असलेल्यांना स्वर्गदूत म्हणाला, “त्याची घाणेरडी वस्त्रे काढा.” मग यहोशुआला तो म्हणाला, “पाहा, मी तुझी पापे दूर केली आहेत आणि आता मी तुला ही महायाजकाची वस्त्रे घालीत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.”