Zechariah 3:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “मी सांगतो त्या प्रमाणे जीवन जग. मी सांगितलेल्या गोष्टी कर. मग माझ्या मंदिराचा तूच मुख्य अधिकारी होशील. मंदिराच्या पटांगणाची तू निगा राखशील. येथे उभ्या असलेल्या देवदूतांप्रमाणे तुलाही माझ्या मंदिरात कोठेही वावरायला मोकळीक असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणार्‍यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘जर तू आज्ञाधारकपणे माझ्या मार्गांनी चालशील, तर तू माझ्या भवनावर शासन करशील आणि माझ्या न्यायमंदिरावर अधिकार चालवशील. ते पवित्र ठेवावेस म्हणून मी ते तुझ्या ताब्यात देईन; आणि इथे उभे असलेल्यांच्या बरोबरीने तू स्थान ग्रहण करशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.