Zechariah 4:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिव आहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मला विचारले, “तुझ्या दृष्टीस काय पडते?” मी म्हणालो, “माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.