Zechariah 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते अतिशय दुराग्रही बनले. ते नियम पाळीनान. सर्व शक्तिमान परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करुन संदेष्ट्यांमार्फत त्याच्या लोकांना संदेश पाठविले. पण लोक ऐकेनात. तेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वर कोपला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले; ह्यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्यांच्यावर मोठा कोप झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे नियम सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करून जे धर्मशास्त्र व संदेष्ट्यांद्वारे वचन पाठवले ते लोक ऐकेनात. त्यांनी आपली मने पाषाणासारखी कठीण केली, तेव्हा सेनाधीश परमेश्वर कोपला.