Zechariah 9:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाचा संदेश. एक शोकसंदेश हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचा संदेश: “इस्राएलमधील वंशांनाच फक्त देवाचे ज्ञान आहे असे नाही. प्रत्येकजण त्याच्याकडे मदतीची अपेक्षा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी: ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही एक भविष्यवाणी आहे: हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले, आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल; कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी याहवेहवर लागलेली आहे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचे वचन: “कारण जशी इस्राएलाच्या वंशांवर तशी मानवजातीवर परमेश्वराची दृष्टी आहे;”