Zechariah 9:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील. दगड व गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील. ते त्यांच्या शत्रू - सैन्याचे रक्त सांडतील. मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील. ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर त्यांचा सांभाळ करील; ते शत्रूंना गिळतील व गोफणगुंडे पायांखाली तुडवतील; ते पितील व द्राक्षारस प्याल्याप्रमाणे गोंगाट करतील; ते यज्ञाच्या कटोर्‍यांसारखे, वेदीच्या कोपर्‍यांसारखे भरून राहतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील. ते नष्ट करतील, आणि गोफणीच्या दगडांनी विजयी होतील. ते प्राशन करतील व मद्यपीसारखे गर्जना करतील; ते वाटीसारखे ओतप्रोत भरतील आणि वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडण्यासाठी उपयोगात येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.