Zechariah 9:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“हे सर्व अष्कलोनचे लोक पाहतील आणि भयभीत होतील. गज्जाचे लोक भीतीने थरथर कापतील आणि एक्रोनचे लोक हे सर्व बघून आपल्या सर्व आशा सोडून देतील. राज्यामध्ये राजा राहणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अष्कलोन हे पाहून घाबरेल; गज्जाही हे पाहून वेणा देईल, व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल; गज्जात राजा नाही असे होईल, अष्कलोनात वस्ती व्हायची नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अष्कलोन हे पाहून भयभीत होईल; गाझा वेदनेने कळवळेल, व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल. गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील, आणि एक्रोन शहराची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही.