Zechariah 9:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते, यापुढे, रक्ताने माखलेले ताजे मांस वा निषिध्द अन्न खाणार नाहीत. वाचलेले, थोडेफार पलिष्टे माझ्या लोकांत सामील होतील आणि यहूदातील आणखी एक घराणे म्हणून राहतील. एक्रोनचे लोक यबूश्यासारखेच माझ्या माणसांत मिसळून जातील. मी माझ्या देशाचे रक्षण करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याच्या मुखातले रक्त1 व त्याच्या दातांतले अमंगळ पदार्थ काढून टाकीन; तोही आमच्या देवासाठी शेष राहील; तो यहूदातल्या सरदारासारखा होईल व एक्रोन यबूशासारखा होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांच्या मुखातून रक्त व त्यांच्या दातांमधून अमंगळ अन्न बाहेर काढेन. जे अवशिष्ट लोक राहतील ते आपल्या परमेश्वराचे होतील आणि यहूदीयाच्या कुळात समाविष्ट करण्यात येतील पलिष्टी आणि एक्रोनचे पूर्वी जसे होते तसे हे लोक यबूसी लोकांप्रमाणे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या मुखातले रक्त आणि दातांतले निषिध्द अन्न मी काढून टाकीन; यहूदाच्या वंशाप्रमाणे तेही आमच्या देवासाठी शेष असे एक घराणे म्हणून राहतील आणि एक्रोनचे लोक यबूस्यांसारखे होतील.