Zephaniah 1:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “मी लोकांना जगणे कठीण करीन. अंधळ्यांना ज्याप्रमाणे आपण कोठे जात आहोत हे कळत नाही, तशी लोकांची स्थिती होईल का? कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले. खूप लोक मारले जातील. त्याचे रक्त जमिनीवर सांडेल. त्यांची प्रेते शेणासारखी जमिनीवर पडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी मनुष्यजातीवर पीडा आणीन, तेव्हा ते अंधळ्यांप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे. त्याचे रक्त धूळीसारखे ओतले जाईल, व त्यांचे मांस शेणासारखे फेकले जाईल.