Zephaniah 1:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व प्राणिमात्रांचा मी नाश करीन. सर्व पक्षी व जलचर मी नष्ट करीन. मी पापी आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व गोष्टी याचा नाश करीन मी पृथ्वीवरच्या सर्व लोकांना पृथ्वीवरुन दूर करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी मनुष्य व पशू नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन; भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन; मी आकाशातील पक्षी नष्ट करेन आणि समुद्रातील मासेही— त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा मी पृथ्वीवरून सर्व मानवजातीला नष्ट करेन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो.