Zephaniah 2:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथे फक्त मेंढ्या व वन्याप्राणी राहतील. शिल्लक राहिलेल्या खांबांवर घुबडे व कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे दारांच्या पायऱ्यांवर बसतील. त्या रिकाम्या घरांत काळे पक्षी जाऊन बसतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कळप व मेंढरे सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील. तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे तिच्या स्तंभावर निवारा घेतील. घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल, तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील, देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.