Zephaniah 3:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत, ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत. त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो; तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत. त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.