Zephaniah 3:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मेजवानीच्या वेळेला लोक असे हासतात, आनंदात असतात, तसाच तो तुझ्याबरोबर हासेल आनंदात असेल.” परमेश्वर म्हणाला, “मी तुझी अप्रतिष्ठा दूर करीन. त्या लोकांना मी तुला दुखवू देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांना मी एकत्र मिळवीन; त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत, ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात, त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन.