Zephaniah 3:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू ह्यापासून धडा शिकावास, म्हणून तुला मी ह्या गोष्टी सांगत आहे. तू मला घाबरावेस व माझा मान राखावास, असे मला वाटते. जर तू असे वागलास, तर तुझ्या घराचा नाश होणार नाही. ठरविल्याप्रमाणे मग मी तुला शिक्षाही करणार नाही.” पण ते वाईट लोक, केल्या आहेत त्यापेक्षा अधिक वाईट गोष्टीच करु इच्छीत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी म्हणालो, ‘तिने माझे भय मात्र धरावे, बोध घ्यावा, म्हणजे तिच्यासंबंधाने मी जे काही ठरवले आहे त्यानुसार तिची वस्ती नष्ट होणार नाही.’ पण त्यांनी आपली सर्व दुष्कर्मे नेटाने चालवली.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेमबद्दल मी विचार केला, ‘निश्चितच तू माझे भय धरशील; आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’ तेव्हा तिचे आश्रयस्थान उद्ध्वस्त होणार नाही. माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत, पण तरीही पूर्वीसारखीच भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत.