bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 John 1
1 John 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
1
जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो;
2
ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे, व त्याची आम्ही साक्ष देतो; ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला कळवतो;
3
जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हांलाही ह्यासाठी कळवतो की, तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे; आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे.
4
तुमचाआमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो.
5
जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.
6
त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही;
7
पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
8
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.
9
जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
10
आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5