bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Thessalonians 1
1 Thessalonians 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
1
देवपित्याच्या ठायी व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
2
आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.
3
आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.
4
देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हांला ठाऊक आहेच;
5
कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळवण्यात आली; तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे.
6
तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;
7
अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झालात.
8
मासेदोनिया व अखया ह्यांत तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही.
9
कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,
10
आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5