bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Thessalonians 2
2 Thessalonians 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
1
बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यांसंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की,
2
तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका; ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणार्या आत्म्याने, किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका.
3
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.
4
तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.
5
मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगत असे ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?
6
त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हांला ठाऊक आहे.
7
कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.
8
मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.
9
ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही; त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
11
त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;
12
ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना शासन व्हावे म्हणून असे होईल.
13
पण बंधुजनहो, प्रभूच्या प्रिय जनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण आत्म्याच्या द्वारे होणार्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.
14
त्यात त्याने तुम्हांला आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
15
तर मग बंधूंनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हांला शिकवले ते बळकट धरून राहा.
16
आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
17
तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
All chapters:
1
2
3