bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
3 John 1
3 John 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
1
प्रिय गायस ह्याला, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील2 ह्याच्याकडून:
2
प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टींत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
3
कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला.
4
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसर्या कशानेही होत नाही.
5
प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस;
6
त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली; देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील.
7
कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत.
8
म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.
9
मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही.
10
ह्यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करतो त्यांची आठवण देईन; तो आमच्याविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो; तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही; आणि तो बंधुजनांचा स्वीकार स्वत:ही करत नाही, आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळीबाहेर घालवून देतो.
11
प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्याने देवाला पाहिलेले नाही.
12
देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वत: सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे; आम्हीही साक्ष देतो; आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे.
13
मला तुला पुष्कळ लिहायचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही;
14
तर मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे, तेव्हा आपण समक्ष बोलू.
15
तुला शांती असो. मित्रमंडळी तुला सलाम सांगतात. मित्रमंडळीसा ज्याच्या-त्याच्या नावाने सलाम सांग.
Jump to:
Chapter 1
All chapters:
1