bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Acts 14
Acts 14
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 15 →
1
मग इकुन्यात असे झाले की, यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहूदी व हेल्लेणी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला.
2
परंतु विरोधी यहूद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले.
3
ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले; त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली.
4
तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली; कित्येकांनी यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली.
5
मग त्यांचा अवमान करून त्यांना दगडमार करण्याकरता परराष्ट्रीय व यहूदी आपल्या अधिकार्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते.
6
हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले;
7
आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले.
8
लुस्त्रात पायांनी अधू असा कोणीएक माणूस बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता.
9
तो पौलाचे बोलणे ऐकत असे; पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून,
10
मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला.
11
मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलला, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”
12
त्यांनी बर्णबाला ‘ज्यूपिटर’ म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला ‘मर्क्युरी’ म्हटले.
13
मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजार्याने बैल व माळा दरवाजांजवळ आणल्या; आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते.
14
हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले,
15
“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.
16
त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले;
17
तथापि त्याने स्वत:स साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त केले.”
18
असे बोलून त्यांनी आपणांला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.
19
नंतर अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहूदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.
20
पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला; मग दुसर्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला.
21
त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्या नगरांत ते परत आले;
22
आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’
23
त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले.
24
मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले.
25
आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.
26
तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले; जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते.
27
तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.
28
मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28