bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Esther 4
Esther 4
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 5 →
1
हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणपाट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले;
2
तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे.
3
राजाचा हुकूम व फर्मान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहचले तेथे तेथे यहूदी लोकांत मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली; बहुतेक लोक गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.
4
एस्तेरच्या दासी व खोजे ह्यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले; तेव्हा राणीला फार खेद झाला; मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याच्याकडे पाठवले, पण तो ते घेईना.
5
राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजांपैकी हथाक ह्याला तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का ह्याची चौकशी कर.
6
हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला.
7
आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहूदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकिकत मर्दखयाने त्याला सांगितली.
8
यहूदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस.
9
हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले.
10
तेव्हा एस्तेरने हथाकाबरोबर मर्दखयास सांगून पाठवले की,
11
“राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.”
12
एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले.
13
तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की, “तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस.
14
तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”
15
मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की,
16
“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”
17
मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10