bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Hosea 6
Hosea 6
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 7 →
1
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.
2
तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.
3
चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”
4
हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्या दहिवराप्रमाणे आहे.
5
म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे.
6
मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.
7
त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.
8
गिलाद हे दुष्कर्म्यांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.
9
मनुष्यांवर टपणार्या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.
10
इस्राएलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे, एफ्राइमात जारकर्म चालू आहे; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.
11
हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14