bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Lamentations 5
Lamentations 5
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
1
हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.
2
आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.
3
आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत.
4
आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो; आमचेच लाकूड आम्हांला मोल देऊन मिळते.
5
आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही.
6
आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो.
7
आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगतो,
8
दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही.
9
रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो.
10
क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे.
11
त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत.
12
त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही.
13
तरुण जन जाती वाहून नेतात, पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात,
14
वेशीत वडील जन दिसत नाहीत, तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत.
15
आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे; आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे.
16
आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत.
17
ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत;
18
सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे त्यांतून कोल्हे फिरत असतात.
19
हे परमेश्वरा, तू सर्वकाळ सिंहासनारूढ असतोस, तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे.
20
तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस?
21
हे परमेश्वरा, तू आम्हांला आपणांकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हांला पुन्हा आण.
22
तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
All chapters:
1
2
3
4
5