bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Luke 12
Luke 12
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 13 →
1
इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.
2
जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही.
3
जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल.
4
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका.
5
तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.
6
पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही.
7
फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.
8
मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील;
9
परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल.
10
आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल; परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही.
11
जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका;
12
कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
13
लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”
14
तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?”
15
आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”
16
त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले.
17
तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’
18
मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन.
19
मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’
20
परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’
21
जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”
22
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करत बसू नका.
23
कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे.
24
कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!
25
तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?
26
म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता?
27
फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा; ती कष्ट करत नाहीत व कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.
28
जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील!
29
तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका.
30
कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे;
31
तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील.
32
हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.
33
जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.
34
कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
35
तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या;
36
आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा.
37
आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील.
38
तो रात्रीच्या दुसर्या किंवा तिसर्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.
39
आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते.
40
तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”
41
तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?”
42
तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?
43
त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.
44
मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.
45
परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,
46
तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील.
47
आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील,
48
परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
49
मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते!
50
मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे.
51
मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास;
52
आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल.
53
मुलाविरुद्ध बाप व ‘बापाविरुद्ध मुलगा,’ मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, ‘सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून’ अशी फूट पडेल.”
54
आणखी तो लोकसमुदायांनाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते.
55
दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल,’ असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते.
56
अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही?
57
आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही?
58
तू आपल्या वाद्याबरोबर अधिकार्याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर; नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल; आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील.
59
मी तुला सांगतो, अगदी शेवटली टोली फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस.”
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24