bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Matthew 9
Matthew 9
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 10 →
1
तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला.
2
मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणाएका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
3
मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.”
4
येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता?
5
कारण ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ असे बोलणे, किंवा ‘उठून चाल’ असे बोलणे, ह्यांतून कोणते सोपे?
6
तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला) ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.”
7
मग तो उठून आपल्या घरी गेला.
8
हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
9
मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
10
नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले.
11
हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?”
12
हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे.
13
‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.”
14
त्या वेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतो, पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”
15
येशू त्यांना म्हणाला, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील.
16
कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत; कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते.
17
तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”
18
तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल.”
19
तेव्हा येशू उठला व त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला.
20
मग पाहा, बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली.
21
कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.”
22
तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.
23
मग येशू त्या अधिकार्याच्या घरात जाऊन पावा वाजवणार्यांना व गलबला करणार्या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला,
24
“वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.
25
मग लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली.
26
हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले.
27
मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”
28
तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू.”
29
तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.”
30
तेव्हा त्यांना दृष्टी आली; मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
31
तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली.
32
मग ते तेथून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले.
33
त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली; तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
34
परंतु परूशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
35
नंतर येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत सर्व नगरांतून व गावांतून फिरत होता.
36
तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.
37
तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत;
38
ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28