bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Micah 2
Micah 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 3 →
1
जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे.
2
ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.
3
म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे.
4
त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”
5
ह्यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहणार नाही.
6
“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”
7
अहो, ज्यांना याकोबाच्या घराण्यातले म्हणतात, ते तुम्ही लोकहो, परमेश्वराचा आत्मा कमी सहनशील आहे काय? ही त्याची कृत्ये आहेत काय? माझी वचने सरळपणे वागण्यार्यांचे बरे करत नाहीत काय?
8
तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता.
9
तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालवता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करता.
10
उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.
11
वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.
12
हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील.
13
तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7