bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Philemon 1
Philemon 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
1
आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला: तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्या मंडळीला;
2
ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:
3
आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
4
प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरवसा ह्यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनांत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो;
6
आणि असे मागतो की, तुमच्यामध्ये [असलेल्या ख्रिस्त येशूमध्ये] जे काही चांगले आहे त्याचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण सफळ व्हावे.
7
तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.
8
ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे,
9
तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,
10
मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो;
11
(तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे.)
12
त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे; [त्याचा स्वीकार कर.]
13
सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते;
14
तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
15
कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने युगानुयुग1 तुझे व्हावे;
16
त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे; मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा.
17
म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर.
18
त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड.
19
हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे; ते मी फेडीन; शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही.
20
हे बंधो, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; माझ्या जिवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे.
21
तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे, आणि मला ठाऊक आहे की, मी जे म्हणतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.
22
त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल1 अशी मला आशा आहे.
23
ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास,
24
आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात.
25
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
Jump to:
Chapter 1
All chapters:
1