bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Philippians 2
Philippians 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
1
ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत,
2
तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
3
तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.
4
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा.
5
अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;
6
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
7
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
8
आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
9
ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले;
10
ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
11
आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
12
म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;
13
कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.
14
जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा;
15
ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता;
16
असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
17
तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
18
आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
19
तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे.
20
तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही.
21
कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;
22
पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.
23
म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे.
24
तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन.
25
तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;
26
कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता;
27
तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.
28
म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.
29
ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;
30
कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4