bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Zephaniah 2
Zephaniah 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
1
हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये;
2
निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुमच्यावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या.
3
देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.
4
कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अष्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल.
5
समुद्रतीरीच्या रहिवाशांना, करेथी राष्ट्रांना धिक्कार असो! हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्याविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे! मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.
6
समुद्रतीरींच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यांत मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील.
7
तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.
8
“यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन-वंशजांनी केलेली निर्भर्त्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा तोरा मिरवला आहे.”
9
म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्चये होईल, अम्मोन वंशज गमोर्यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”
10
त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांना तुच्छ मानले व त्यांच्यावर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांना हे प्रतिफळ मिळेल.
11
परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.
12
अहो कूशाच्या रहिवाशांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.
13
तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.
14
गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,
15
हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
All chapters:
1
2
3