bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
2 John 1
2 John 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
1
वडीलजनांकडून निवडलेली महिला व तिची मुले ह्यांना: मी तुमच्यावर खरोखर प्रीती करतो व केवळ मीच नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे, ते सर्वच करतात.
2
कारण सत्य आपल्यामध्ये आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील.
3
देवपित्याकडून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडून सत्यात व प्रीतीत आपल्याला कृपा, दया व शांती मिळो.
4
आपल्याला पित्याकडून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.
5
बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच लिहितो.
6
प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे, तसे तुम्ही प्रीतीने चालावे.
7
फसवणूक करणारी, म्हणजेच येशू ख्रिस्त मानव म्हणून आला हे मान्य न करणारी, पुष्कळ माणसे जगात वावरत आहेत. असा मनुष्य फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधी आहे.
8
आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण पारितोषिक तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या.
9
ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ह्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे.
10
म्हणून हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करू नका; त्याचे क्षेमकुशलदेखील विचारू नका.
11
कारण जो त्याचे स्वागत करतो, तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.
12
मी तुम्हांला पुष्कळ लिहिणार होतो परंतु ते कागद व शाई ह्यानी लिहावेसे वाटत नाही, तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल, अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.
13
तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला शुभेच्छा पाठवीत आहेत.
Jump to:
Chapter 1
All chapters:
1