bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
2 Timothy 3
2 Timothy 3
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
1
शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे लक्षात ठेव.
2
माणसे आत्मकेंद्रित, धनलोभी, बढाईखोर, अहंकारी, दुर्भाषण करणारी, आईबापांना न मानणारी, कृतघ्न, अपवित्र,
3
ममताहीन, क्षमा न करणारी, निंदक, असंयमी, उग”, चांगुलपणाचा द्वेष करणारी,
4
विश्वासघातकी, हेकेखोर, उद्धट, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,
5
आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा.
6
त्यांच्यापैकी काही लोक दुसऱ्यांच्या घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या,
7
सदा शिकत असूनही सत्याचे ज्ञान मिळवू न शकणाऱ्या भोळ्या स्त्रियांस वश करतात.
8
यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक विवेकभ्रष्ट व विश्वासासंबंधाने अपयशी ठरलेले आहेत,
9
परंतु हे लोक प्रगती करू शकणार नाहीत कारण जसे यान्नेस व यांब्रेस ह्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.
10
परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस.
11
अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या ठिकाणी माझ्या बाबतीत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तुला ठाऊक आहे. त्या सर्वांतून प्रभूने मला मुक्त केले.
12
ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल
13
परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील.
14
तू मात्र ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.
15
त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे.
16
प्रत्येक धर्मशास्त्रलेख परमेश्वरप्रेरित सत्य शिकविण्यासाठी, असत्याचे खंडण करण्यासाठी, दोष सुधारविण्यासाठी व सद्वर्तनाविषयी बोध करण्यासाठी उपयोगी आहे.
17
ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4