bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
3 John 1
3 John 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
1
प्रिय गायस, तुझ्यावर खरी प्रीती करणारा, वडीलजनांपैकी एक तुला हे पत्र लिहीत आहे.
2
प्रिय मित्रा, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे सर्व बाबतीत तुझे चांगले चालावे व तुला आरोग्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो.
3
तू नेहमी सत्याने चालतोस म्हणून तू सत्याशी निष्ठावंत आहेस, अशी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, तेव्हा मला अत्यानंद झाला.
4
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
5
प्रिय मित्रा, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस.
6
त्यांनी ख्रिस्तमंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी येथे साक्ष दिली आहे. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना पुढची वाटचाल करण्यास साहाय्य कर.
7
कारण ते यहुदीतर लोकांपासून काहीच न घेता ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी बाहेर पडले आहेत.
8
म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या सेवाकार्यात त्यांचे सहकारी होऊ.
9
मी ख्रिस्तमंडळीला छोटेसे पत्र लिहिले परंतु ख्रिस्तमंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष देत नाही.
10
ह्यामुळे जर मी आलो तर तो जी कृत्ये करतो, त्याकडे लक्ष वेधीन. तो आम्हांला त्रासदायक होतील अशा मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो. तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो करू देत नाही व ख्रिस्तमंडळीतून बाहेर घालवून देतो.
11
प्रिय मित्रा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवाला आवडतो; वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.
12
देमेत्रियविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे, हे तुला ठाऊक आहे.
13
मला पुष्कळ लिहावयाचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही.
14
मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू.
15
तुला शांती लाभो. मित्रमंडळी तुला शुभेच्छा पाठवीत आहे. आपल्या सर्व मित्रमंडळीला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा कळव.
Jump to:
Chapter 1
All chapters:
1