bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Ephesians 1
Ephesians 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 2 →
1
येशूमधील जीवनात विश्वासू असणाऱ्या इफिस येथील पवित्र लोकांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून:
2
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.
3
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे.
4
आपण प्रीतीत त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडून घेतले.
5
त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने निवडले आहे.
6
त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे.
7
त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.
8
त्याचे सर्व शहाणपण व अंतर्ज्ञान ह्यांना अनुसरून त्याने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे.
9
स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.
10
ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील.
11
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे ख्रिस्तावरील आपल्या निष्ठेमुळे त्याने आपल्याला त्याचे वारसदार म्हणून निवडले आहे.
12
सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या.
13
तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे.
14
हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!
15
प्रभू येशूमध्ये असलेला तुमचा विश्वास आणि सर्व पवित्र लोकांबद्दल तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून,
16
मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी माझ्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की,
17
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला त्याच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान व प्रकटीकरण देणारा पवित्र आत्मा द्यावा.
18
म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी
19
आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपल्याविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व या गोष्टी, तुम्ही त्याच्या सामर्थ्यशाली पराक्रमाच्या कृतीवरून जाणून घ्याव्यात.
20
देवाने हे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि आपल्या उजवीकडे स्वर्गीय जगतात बसविले.
21
तेथे तो सर्व स्वर्गीय राज्यकर्त्यांवर, अधिकाऱ्यांवर, सामर्थ्यावर व प्रभूंवर राज्य करतो. ह्रीच्या व भावी युगांतील सर्व अधिकारपदांपेक्षा उच्च अधिकारपद त्याला मिळाले आहे.
22
परमेश्वराने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्याने सर्वांचे मस्तक व्हावे म्हणून त्यास ख्रिस्तमंडळीसमोर सादर केले.
23
ही ख्रिस्तमंडळी शरीर असून जो सर्व काही सर्व ठिकाणी परिपूर्ण करतो त्याची ख्रिस्तमंडळी ती परिपूर्ती आहे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6