bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Galatians 4
Galatians 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
1
आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत अल्पवयीन आहे, तोपर्यंत तो सर्वं मालमत्तेचा धनी असूनही तो व गुलाम यांच्यामध्ये काही फरक नसतो.
2
बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो.
3
त्याचप्रमाणे आपणही अल्पवयीन होतो, तेव्हा आपणदेखील ह्या विश्वातील सत्ताधिकारी आत्म्यांच्या गुलामगिरीत होतो.
4
परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.
5
ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.
6
तुम्ही पुत्र आहात, हे दर्शविण्यासाठी देवाने ‘पित्या, माझ्या पित्या’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे.
7
ह्यावरून तू आत्तापासून गुलाम नाहीस, तर पुत्र आहेस आणि म्हणूनच देवाने आपल्या लेकरांकरिता जे राखून ठेवले आहे, ते सर्व तो तुला देईल.
8
पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता आणि त्यामुळे जे वस्तुतः देव नाहीत, त्यांचे तुम्ही गुलाम होता.
9
परंतु आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बल व हीन दर्जाच्या दैवतांकडे पुन्हा कसे वळता? त्यांचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा का बाळगता?
10
विशिष्ट वार, महिने, सणाचे काळ व वर्षे हे तुम्ही पाळता.
11
तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.
12
बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही तसा मीही होतो, तुम्ही माझे काही वाईट केले नाही.
13
तुम्हांला शुभवर्तमान सांगण्याची पहिली संधी मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाली, हे तुम्हांला ठाऊक आहे.
14
तुम्हांला अडचणीत टाकण्याइतकी माझी प्रकृती बिघडलेली असताना तुम्ही माझा धिक्वार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केला.
15
त्या वेळी तुम्हांला किती आनंद झाला होता! मग आता काय झाले? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे काढून ते मला दिले असते.
16
मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?
17
ते दुसरे लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला माझ्यापासून वेगळे ठेवू पाहतात.
18
तुम्हांला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची खटपट करावी हे चांगले आहे, मात्र ते चांगल्या हेतूने करायला हवे. हे सर्वदा खरे आहे आणि केवळ मी तुमच्यांजवळ आहे, तेव्हाच खरे आहे असे नाही.
19
माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसृतीवेदना होत आहेत.
20
ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते, तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी चिंताग्रस्त झालो आहे.
21
जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.
22
धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.
23
दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला देवाच्या वचनामुळे जन्मला.
24
ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत, त्या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार होत, एक स्त्री म्हणजे हागार. हिची मुले गुलामगिरीत जन्मला आली. सीनाय पर्वतावर केलेल्या कराराची ती प्रतिनिधी आहे.
25
हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचा निर्देश करते आणि ह्रीची यरुशलेम नगरी तिच्यासारखी आहे. ती आपल्या मुलांबाळासह गुलामगिरीत आहे.
26
परंतु स्वर्गीय यरुशलेम नगरी स्वतंत्र असून ती आपली माता आहे.
27
धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला कधीच प्रसूतिवेदना झाल्या नाहीत, ती तू आनंदाने आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा परित्यक्त अशा स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.
28
बंधुजनहो, इसहाकप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
29
त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला आणि आत्ताही तसा होत आहे.
30
पण धर्मशास्रलेख काय म्हणतो? ‘त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणार नाही.’
31
म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6