bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
James 4
James 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
1
तुमच्यामध्ये भांडणतंटे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही?
2
तुम्ही इच्छा धरता, तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही घात करायला तयार होता. हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही म्हणून तुम्ही भांडणतंटे करता. तुम्ही देवाकडे मागत नाही, म्हणून तुम्हांला मिळत नाही
3
आणि जेव्हा तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही, तेव्हा तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता मागता.
4
अहो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो.
5
‘जो आत्मा आपल्यामध्ये वसती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते’, हा धर्मशास्त्रलेख व्यर्थ आहे, असे तुम्हांला वाटते काय?
6
देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते. म्हणून धर्मशास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो’.
7
म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.
8
देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात स्वच्छ करा, अहो, ढोंगी लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.
9
दुःख धरा, रडा व शोक करा; तुमच्या हसण्याचे रडण्यात व तुमच्या आनंदाचे खिन्नतेत परिवर्तन होवो!
10
प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.
11
बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूंविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस, तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस.
12
नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरविणारा तू कोण?
13
अहो! तुम्ही जे म्हणता, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू’,
14
त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते.
15
उलट तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूची इच्छा असेल, तर आपण जगू व अमुक-अमुक करू’.
16
परंतु आता तुम्ही उर्मटपणाने फुशारकी मारता आणि अशी फुशारकी दुष्ट आहे.
17
चांगले करणे कळत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5