bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Philippians 4
Philippians 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
1
प्रियजनहो, तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे; तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा.
2
मी युवदीयेला व संतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूमध्ये एकचित्त व्हा.
3
तसेच हे माझ्या विश्वासू सहकाऱ्या, मी तुलाही विनंती करतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे इतर सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले, त्यांना साहाय्य कर.
4
प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा.
5
तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे.
6
कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.
7
म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील.
8
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.
9
माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.
10
मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती.
11
मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे.
12
दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो.
13
मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो.
14
तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले.
15
फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनो, तुम्हांला ठाऊक आहे की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही ख्रिस्तमंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही.
16
मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली.
17
मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.
18
माझ्याजवळ सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंधित समर्पण असून देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे.
19
माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.
20
आपल्या देवपित्याचा युगानुयुगे गौरव होवो. आमेन.
21
ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र व्यक्तीला शुभेच्छा द्या. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात.
22
सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात.
23
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
All chapters:
1
2
3
4