bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Titus 3
Titus 3
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
1
ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.
2
कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे;
3
कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.
4
जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला,
5
तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले.
6
देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे.
7
ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी.
8
हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत
9
परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत.
10
तट पाडणाऱ्या माणसाला निदान दोनदा इशारा दे आणि नंतर त्यांच्याशी संबंध ठेवू नको.
11
असला माणूस विकृत आहे, हे तुला ठाऊक आहे आणि त्याची पापे त्याचा न्यायनिवाडा करतात.
12
मी अर्तमला किंवा तुखिकला तुझ्याकडे पाठविल्यावर जमेल तितक्या लवकर तू माझ्याकडे निकपलिस येथे निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचे मी ठरविले आहे.
13
जेना वकील व अपुल्लो ह्यांना काही उणीव भासणार नाही अशा तयारीने शक्य तितक्या लवकर रवाना कर.
14
आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.
15
माझ्याबरोबर असलेले सर्व जण तुला शुभेच्छा कळवतात. आपल्या श्रद्धावंत स्नेह्यांना आमच्या शुभेच्छा कळव. तुम्हां सर्वांवर देवाची कृपा असो.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
All chapters:
1
2
3